Tuesday, November 24, 2009

articles about theplay in Newspaper

१० नोव्हेंबर चा प्रयोग पाहिल्यानंतर श्री.मुकुंद कुळे यांनी प्रहार वृत्तपत्रात लिहिलेला लेख पुढील लिंक वर वाचा.

http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=15832&boxid=54651578

किंवा

http://epaper.prahaar.in/epaperpdf/19112009/19112009-md-hr-12.pdf

Next Shows

Yoneechyaa Maneechyaa GujagoshTee
2 shows
Date - 2nd December
Time - 7.0 pm and 9.0 pm
Venue
Mini Theatre,
PLDeshpande Academy,
(near Ravindra Natya Mandir)
Prabhadevi, Mumbai.
योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
दिनांक २ डिसेंबर २००९ दोन प्रयोग
मिनी थिएटर , पु.ल.देशपांडे कला अकादमी,

(रविंद्र नाट्यमंदीर शेजारी)
प्रभादेवी,
७ वाजता आणि रात्री ९
वाजता
कलाकार - नेहमीचे यशस्वी

दिवाळी अंकातले लेख

एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायचा राहूनच गेला. . .!
या वर्षी चार दिवाळी अंकांमध्ये "योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" नाटका बद्दल लेख प्रसिद्ध झालेत...
मागच्या वर्षी नवा माणूस च्या अंकात एक लिहिल्या नंतर हे नाटक आज कुठपर्यंत पोचले आहे ते पाहून खूप छान वाटते आहे. हे सर्व लेख इथे वाचण्यासाठी दोन दिवसात उपलब्ध करूनदेईन ...
पण ज्यांना मासिक हातात धरून वाचायला आवडते त्यांच्या साठी इथे दिवाळी अंकाची नावे आज देते आहे!

पालकनीती

मायमावशी

पुरुष उवाच


नाट्यरंग (सकाळ प्रकाशन)

new members of the blog

बऱ्याच दिवसांनी ब्लॉग उघडल्यामुळे नव्याने जॉइन झालेल्या मेंबर्स चे उशीराने स्वागत करीत आहे.
आस्था, निरंजन, दया, संतोष तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत!तुम्हाला हा ब्लॉग कसा वाततोय? त्यावर आणखी काय वाचायला तुम्हाला आवडेल ते इथे अवश्य लिहा. मला तुमच्याशी ई-मेल च्या माध्यमातून संपर्क ठेवायला नक्की आवडेल.पण मला इथे कुणाचेही ई-मेल पत्ते सापडले नाहीत.

ईव्ह एन्सलर सोबत भेट

ईव्ह एन्सलर सोबत चे फोटो जरी काढायचे राहून गेले तरी तिचे मी काढलेले काही फोटो इथे लावते आहे...







गेल्या दोन महिन्यात....

गेल्या दोन महिन्यांपासून इथे काहिच लिहिले नाही.
खरंतर लिहिण्यासारखं सांगण्यासारखं खूप काही केले आहे. कदाचित म्हणूनच लिहायला फुरसत काढता आली नाही.
सप्टेंबर मध्ये अमरावतीला आणि नाशिकला "योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" चे अभिवाचन केले.
खूप सुंदर प्रतिसाद होता.
त्यानंतर ऑक्टोबर मध्ये सेन्सॉरचे कायमस्वरूपी प्रमाणपत्र हाती आले आणि आंतरराष्ट्रिय लायसन्स देखिल प्रत्यक्षात हातात येऊन पडले! त्यामुळे उत्साहाने पहिल्यावहिल्या जाहीर प्रयोगाच्या तयारीला लागले.

त्याचसुमारास नाट्यलेखिकांचा आंतरराष्ट्रीय मेळावा मुंबईत होऊ घातला होता. त्यानिमित्ताने अनेक विषयांची स्त्रीप्रधान दृष्टीकोनातून मांडणी असलेली नाटके पहाण्याची मेजवानी मिळाली. आपल्या देशातील आणि परदेशातील अनेक नाट्यलेखिका आणि रंगकर्मींना भेटता आले.

सर्वात छान घटना म्हणजे १० नोव्हेंबरला संध्याकाळी पहिला जाहिर प्रयोग करण्यापूर्वी ’द व्हजायना मोनोलॉग्ज’ ची मूळलेखिका ईव्ह एन्सलर हिच्याशी प्रत्यक्ष भेट घडली. ती अगदी अविस्मरणीय च होती. मराठी अनुवादात काम करणाऱ्या आमच्या सगळ्या टीम साठी तो क्षण अतिशय प्रेरणा देणारा होता. ईव्हने आमच्या अनुभवांबद्दल आस्थेने चौकशी केली. आम्हाला आमच्या संहितेवर सही करून शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या भेटीत आमच्या नाटकाचा प्रयोग पाहण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. आम्ही सगळ्या जणी या भेटीने अतिशय आनंदलो होतो आणि त्या आनंदाच्या भरात आमचे एकत्र फोटो मात्र काढले गेले नाहीत. त्यानंतर आम्ही ईव्ह एन्सलर च्या एकाही बैठकीला हजर राहू शकलो नाही - पण अनेक जणांनी सांगितले की तिने सर्व ठिकाणी अतिशय कौतुकाने आणि अभिमानाने आपल्या नाटकाचा मराठी अनुवाद झाल्याबद्दल उल्लेख केला.