कणेकरांच्या आचरट लेखाला मी दिलेले उत्तर आवडल्याचे अनेक फोन्स आणि ई-मेल्स येताहेत. केवळ महाराष्ट्राच्याच कोनाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी अमेरीका, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणच्या अनोळखी माणसांनी ई-मेल पाठवून माझे लोकप्रभातील उत्तराबद्दल अभिनंदन केले आहे. अनेकांनी कणेकरांचा आचरट लेख पाहून काळजी व्यक्त केली होती. त्यंनाही माझे उत्तर वाचून समाधान वाटल्याचे कळवले आहे.
दरम्यान, पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटर मधला प्रयोग कल्पनेपलिकडे यशस्वी झाला. प्रेक्षागृहाच्या क्शःअमतेपेक्षा दुपटीने जास्त लोक नाटक पहायला आले होते. लागोपाठ दोन प्रयोग असूनही अनेकांना तिकिटाशिवाय परत जावे लागले होते. मुंबईतला पुढचा प्रयोग रवीवारी असणार आहे; त्या वेळी हीए मंडळी पुन्हा नाटकाला येतील अशी खात्री आहे. प्रयोगानंतर अनेकांनी आवर्जून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. सर्वांनाच प्रयोग आवडला होता आणि अशा प्रयोगांची आज गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते.
फक्त एका प्रेक्षकाने असे सांगितले की- आपल्याकडे स्त्रीयांना खूप मान असतोत्यामुळे अशा प्रयोगांची काही तितकीशी गरज नाही! मी त्यांच्या मताचा आदर करूनही माझ्या बाजूने वस्तुस्थिती निरळी असल्याचे त्यांना सांगितले. ज्यांनी जाणूनबुजून भ्रमातच रहायचे ठरवले आहे त्यांना आपण काय सांगणार?
लोकप्रभातील माझी कणेकरांच्या लेखावरची प्रतिक्रिया काही माणसांना वैयक्तिक टिप्पनी करणारी वाटली यचे मात्र मला अश्चर्य वाटले! मी काही कणेकरांचे कपडे, जेवणाखाण्याच्या सवयी याबद्दल मत व्यक्त केलेले नव्हते. त्यांच्या लिखाणाच्या शैलीबद्दल काही म्हणणे हे वैयक्तिक टीका करणे आहे - असे मला वाटत नाही. त्यांच्या या शैलीमुळेच त्यांनी बेजबाबदार टीका केली होती हेच मी सांगत होते . असो- कणेकरांची शैली आवडणारे अनेक लोक असू शकतात ; कदाचित अशा माणसांना स्वत:वरच टीका झाल्यासारखे वाटले असेल.असो!
This is a blog about my play "Yoneechyaa Maneechyaa Gujgoshti" . It is a first ever marathi translation of the internationally acclaimed play - "The Vagina Monologues"
-
अनेक महिन्यात ब्लॉग लिहिला नाही. . . काम मात्र भरपूर सुरू होते ; इतके की - जून नंतर नाटकाचे प्रयोग करायलाही वेळ मिळेनासा झाला. मागच्या महिन...
-
कणेकरांच्या आचरट लेखाला मी दिलेले उत्तर आवडल्याचे अनेक फोन्स आणि ई-मेल्स येताहेत. केवळ महाराष्ट्राच्याच कोनाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी अमेरीक...
3 comments:
hi
kanekaranchi samisha kaai hoti ti kothe vachayala milel
suryakant
Shirish Kanekar lekh
http://www.loksatta.com/lokprabha/20091204/metkut.htm
Vandana Khare reaction
http://www.loksatta.com/lokprabha/20091211/pratikriya3.htm
Shirish Kanekar Re-Reaction
http://www.loksatta.com/lokprabha/20091218/metkut.htm
Mumbai next prayog kuthe tharla tar please blog var update karal ka?
Post a Comment