नव्या वर्षात पहिल्यांदाच आज ब्लॉग उघडला आहे! आणि मला नव्या वर्षाची किती छान भेट मिळाली आहे! अहाहा!!
चक्क २३ मेंबर्स! इतके लोक हा ब्लॉग वाचायला येतात, मेंबर देखिल होतात , हे पाहून खरंच खूप छान वाटतं आहे!
सध्या माझ्याकडे घरी कॉंप्युटर नाही आहे, त्यामुळे ब्लॉग लिहायला वेळ झालेला नाही.
शिवाय The Vagina Monologues या नाटकापासून प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या माझ्या Breaking Silence, Voicing Concerns प्रोजेक्टचे कामदेखिल जोरात सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसात दोन वर्कशॉप्स पार पडली. लवकरच त्यावर आधारित लेख लिहून पूर्ण होईल. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी इतक्या संवेदनाशील विषयावर बोलणे आणि त्यातून काही सृजनशील निर्मिती केली जाणे हा अनुभव एकाच वेळी खूप आनंद देणारा आणि थकवून टाकणाराही आहे!
त्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. एकदा कॉम्प्युटर हाती आला की मग या ब्लॉगवर बरंच लिखाण येईल. तोपर्यंत सर्वांना Happy New Year!
This is a blog about my play "Yoneechyaa Maneechyaa Gujgoshti" . It is a first ever marathi translation of the internationally acclaimed play - "The Vagina Monologues"
Showing posts with label breaking silence. Show all posts
Showing posts with label breaking silence. Show all posts
Monday, January 18, 2010
Wednesday, September 16, 2009
पुन्हा एकदा बातमीत
http://www.mumbaimirror.com/index.aspx?Page=article§name=News%20-%20City§id=2&contentid=2009091520090915024522671652aec79
काल मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रात "योनीच्या मनीच्या गुजगोष्ती" बद्दल बातमी आली आहे. तिची लिंक वर दिलेली आहेच!
दुर्दैवाने या बातमीतल्या तपशीलात बऱ्याच चुका आहेत.
पण एकदा छापून आल्यावर काही इलाज नसतो!असो.
या नाटकाशी संबंधीत एक नवीन प्रकल्प सुरू करीत आहे.
" Braking Silence, Voicing Concerns"
या प्रकल्पाद्वारे मी कार्यशाळांची मालिका सुरू करीत आहे. या कार्यशाळांमध्ये स्त्रीया, पुरुष आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती सहभागी होणार आहेत. लैंगिकतेविषयीच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी एक अवकाश तयार करता यावे असा या मागचा उद्देश आहे. यात सहभागी होणाऱ्या व्यक्ती कथा, कविता, स्वगते अशा विविध रूपात अभिव्यक्ती करतील. वेळोवेळी त्याबद्दलची माहिती इथे मी सांगत जाईनच!

-
अनेक महिन्यात ब्लॉग लिहिला नाही. . . काम मात्र भरपूर सुरू होते ; इतके की - जून नंतर नाटकाचे प्रयोग करायलाही वेळ मिळेनासा झाला. मागच्या महिन...
-
ब्लॉगचे सभासद वाढत आहेत, ते पाहून छान वाटतंय! मागच्या आठवड्यात लोकप्रभा नावाच्या अंकात १०नोव्हेंबर चा प्रयोग पाहून एक आचरट लेख प्रसिद्ध झाला...
-
‘अविस्मरणीय’ असं विशेषण वापरता येईल असे अगदी मोजके क्षण मी अनुभवले आहेत!गेल्या आठवड्यात धारावीतल्या महिलांसाठी केलेला प्रयोग आणि त्यानंतर त्...