Saturday, December 5, 2009

कणेकरांच्या लेखावरील माझ्या प्रतिक्रियेला मिळालेला प्रतिसाद

कणेकरांच्या आचरट लेखाला मी दिलेले उत्तर आवडल्याचे अनेक फोन्स आणि ई-मेल्स येताहेत. केवळ महाराष्ट्राच्याच कोनाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी अमेरीका, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणच्या अनोळखी माणसांनी ई-मेल पाठवून माझे लोकप्रभातील उत्तराबद्दल अभिनंदन केले आहे. अनेकांनी कणेकरांचा आचरट लेख पाहून काळजी व्यक्त केली होती. त्यंनाही माझे उत्तर वाचून समाधान वाटल्याचे कळवले आहे.
दरम्यान, पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटर मधला प्रयोग कल्पनेपलिकडे यशस्वी झाला. प्रेक्षागृहाच्या क्शःअमतेपेक्षा दुपटीने जास्त लोक नाटक पहायला आले होते. लागोपाठ दोन प्रयोग असूनही अनेकांना तिकिटाशिवाय परत जावे लागले होते. मुंबईतला पुढचा प्रयोग रवीवारी असणार आहे; त्या वेळी हीए मंडळी पुन्हा नाटकाला येतील अशी खात्री आहे. प्रयोगानंतर अनेकांनी आवर्जून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. सर्वांनाच प्रयोग आवडला होता आणि अशा प्रयोगांची आज गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते.
फक्त एका प्रेक्षकाने असे सांगितले की- आपल्याकडे स्त्रीयांना खूप मान असतोत्यामुळे अशा प्रयोगांची काही तितकीशी गरज नाही! मी त्यांच्या मताचा आदर करूनही माझ्या बाजूने वस्तुस्थिती निरळी असल्याचे त्यांना सांगितले. ज्यांनी जाणूनबुजून भ्रमातच रहायचे ठरवले आहे त्यांना आपण काय सांगणार?
लोकप्रभातील माझी कणेकरांच्या लेखावरची प्रतिक्रिया काही माणसांना वैयक्तिक टिप्पनी करणारी वाटली यचे मात्र मला अश्चर्य वाटले! मी काही कणेकरांचे कपडे, जेवणाखाण्याच्या सवयी याबद्दल मत व्यक्त केलेले नव्हते. त्यांच्या लिखाणाच्या शैलीबद्दल काही म्हणणे हे वैयक्तिक टीका करणे आहे - असे मला वाटत नाही. त्यांच्या या शैलीमुळेच त्यांनी बेजबाबदार टीका केली होती हेच मी सांगत होते . असो- कणेकरांची शैली आवडणारे अनेक लोक असू शकतात ; कदाचित अशा माणसांना स्वत:वरच टीका झाल्यासारखे वाटले असेल.असो!

Thursday, December 3, 2009

ब्लॉगचे सभासद वाढत आहेत, ते पाहून छान वाटतंय!
मागच्या आठवड्यात लोकप्रभा नावाच्या अंकात १०नोव्हेंबर चा प्रयोग पाहून एक आचरट लेख प्रसिद्ध झाला होता. केवळ १५ मिनिटे नाटक पाहून , शिरीष कणेकर या गृहस्थांनी हे नाटक ओंगळ आणि किळसवाणं असल्याचं म्हटलं होतं! नाटकातल्या धीट शब्दांचे संदर्भ सोडून उल्लेख करीत - हे नाटक भारतीय संस्कृती मध्ये अशोभनीय असल्याचे या अतिरेकी लेखात त्यांनी म्हटले होते. या लेखा कडे मी दुर्लक्ष करावे असेच अनेक मित्रमैत्रिणींचे म्हणणे होते.
पण उघड उघड बदनामी करणाऱ्या या लेखाविषयीचे स्वत:चे म्हणणे एकदा तरी मांडावे असे मला वाटले.
म्हणून मी लोकप्रभाला मी माझी प्रतिक्रिया पाठवली. आणि त्यांनी ती छापलेली आहे. कणेकरांच्या लेखाची आणि माझ्या प्रतिक्रियेची लिंकइथे देत आहे
कणेकरांचा लेख
http://www.loksatta.com/lokprabha/20091204/metkut.htm
माझी प्रतिक्रिया -

हे माझं उत्तर

Tuesday, November 24, 2009

articles about theplay in Newspaper

१० नोव्हेंबर चा प्रयोग पाहिल्यानंतर श्री.मुकुंद कुळे यांनी प्रहार वृत्तपत्रात लिहिलेला लेख पुढील लिंक वर वाचा.

http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=15832&boxid=54651578

किंवा

http://epaper.prahaar.in/epaperpdf/19112009/19112009-md-hr-12.pdf

Next Shows

Yoneechyaa Maneechyaa GujagoshTee
2 shows
Date - 2nd December
Time - 7.0 pm and 9.0 pm
Venue
Mini Theatre,
PLDeshpande Academy,
(near Ravindra Natya Mandir)
Prabhadevi, Mumbai.
योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
दिनांक २ डिसेंबर २००९ दोन प्रयोग
मिनी थिएटर , पु.ल.देशपांडे कला अकादमी,

(रविंद्र नाट्यमंदीर शेजारी)
प्रभादेवी,
७ वाजता आणि रात्री ९
वाजता
कलाकार - नेहमीचे यशस्वी

दिवाळी अंकातले लेख

एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायचा राहूनच गेला. . .!
या वर्षी चार दिवाळी अंकांमध्ये "योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" नाटका बद्दल लेख प्रसिद्ध झालेत...
मागच्या वर्षी नवा माणूस च्या अंकात एक लिहिल्या नंतर हे नाटक आज कुठपर्यंत पोचले आहे ते पाहून खूप छान वाटते आहे. हे सर्व लेख इथे वाचण्यासाठी दोन दिवसात उपलब्ध करूनदेईन ...
पण ज्यांना मासिक हातात धरून वाचायला आवडते त्यांच्या साठी इथे दिवाळी अंकाची नावे आज देते आहे!

पालकनीती

मायमावशी

पुरुष उवाच


नाट्यरंग (सकाळ प्रकाशन)

new members of the blog

बऱ्याच दिवसांनी ब्लॉग उघडल्यामुळे नव्याने जॉइन झालेल्या मेंबर्स चे उशीराने स्वागत करीत आहे.
आस्था, निरंजन, दया, संतोष तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत!तुम्हाला हा ब्लॉग कसा वाततोय? त्यावर आणखी काय वाचायला तुम्हाला आवडेल ते इथे अवश्य लिहा. मला तुमच्याशी ई-मेल च्या माध्यमातून संपर्क ठेवायला नक्की आवडेल.पण मला इथे कुणाचेही ई-मेल पत्ते सापडले नाहीत.

ईव्ह एन्सलर सोबत भेट

ईव्ह एन्सलर सोबत चे फोटो जरी काढायचे राहून गेले तरी तिचे मी काढलेले काही फोटो इथे लावते आहे...