लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स , या वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे अभिवाचनाच्या स्वरुपातील नाटकाला महाराष्ट्राच्या विविध शहरी भागांमधून उदंड प्रतिसाद मिळत आहे.जूनमध्ये कोल्हापूर आणि रत्नागिरी ह्या दोन शहरात आम्ही प्रयोग केले.
एरव्ही "लैंगिकता" या विषयावर मोकळेपणाने बोलायची पद्धत नसली तरी प्रयोगानंतर प्रेक्षक या विषयाच्या भावनिक आणि मानसिक पैलूंबद्दल चर्चा करीत होते.
कोल्हापूरमध्ये प्रयोग सर्वांसाठी खुला होता. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या प्रयोगाला समाजकार्यकर्ते, डॉक्टर्स, रंगकर्मी यांच्या बरोबरीने काही सेक्स वर्कर्स देखिल उपस्थित होत्या. आणि त्यांनी देखिल चर्चेत भाग घेतला.
रत्नागिरी मध्ये आयोजकांनी मात्र फक्त स्त्रीयांसाठी प्रयोग आयोजित केला होता. त्या प्रयोगानंतरची चर्चा फारच रंगली.या विषयावर मोकळेपणाने बोलायची सर्वच वयोगटातल्या स्त्रीयांना किती गरज वाट्ते , ते जाणवले!
तिथे एका डॉक्टरांनी अशी सूचना केली की, प्रयोगाच्या वेळी स्त्रीयांच्या जननेंद्रियांबद्दल व लैंगिक अवयवांबद्दल माहिती देणारी एखादी पुस्तिका ही प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून द्यावी. प्रेक्षकातून या सूचनेचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले