Friday, March 8, 2013



आज जागतिक महिला दिवस आहे.त्यानिमित्त अनेक वृत्तपत्रांनी विशेष पुरवणी तयार केली आहे. दैनिक लोकमत च्या अंकात त्या निमित्त माझी छोटिशी मुलाखत आली आहे. ब्लॉगवर ती लिंक जोडता आ्ली नाहीये. . . म्हणून त्यातले text इथे देत आहे "
"

आता गुजगोष्टींच्या गोष्टी पुस्तकरूपात
(08-03-2013 : 00:20:20)  
http://onlinenews1.lokmat.com/newsimages/MainEdition-1-1-07-03-2013-d070d-5ec21.jpg


शिल्पा सुर्वे। दि. ७ (मुंबई)
स्त्रियांच्या लैंगिकतेशी जोडलेला योनी हा निषिद्ध शब्द घेऊन चार वर्षांपूर्वी योनीच्या मनीच्या गुजगोष्टीहे मराठी नाटक रंगमंचावर आले. आज १0५ प्रयोगांपर्यंतचा टप्पा या नाटकाने ओलांडला आहे. लैंगिकतेला मौनाच्या कुंपणातून बाहेर काढणार्‍या या नाटकाचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. या प्रवासादरम्यानच्या म्हणजेच गुजगोष्टींच्या गुजगोष्टी लेखिका, दिग्दर्शिका वंदना खरे यांनी पुस्तकरूपात मांडण्याचा संकल्प आजच्या महिला दिनी सोडला आहे.
अमेरिकन लेखिका ईव्ह एन्सलर यांच्या व्हजायना मोनोलॉग्जया नाटकाचे मराठी रूपांतर म्हणजे योनीच्या मनीच्या गुजगोष्टी.बोल्ड विषय घेऊन रंगमंचावर आलेल्या या नाटकाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यावर आगामी पुस्तकाविषयी बोलताना वंदना खरे म्हणतात, या नाटकाने स्वत:च्या सेक्शुअँलिटीबद्दल बोलायला महिलांना जागा मिळवून दिली. लैंगिकता म्हणजे भीती, लाज, तिटकारा, नकोसेपणा इतकेच नव्हे, तर सुख, आनंद, हक्क आणि अधिकारही आहे. नाटकाला येणार्‍या प्रेक्षकांना योनी हा शब्द म्हणायला लावून नाटकाला आम्ही सुरुवात करतो. नाट्यगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी येऊन अनेक प्रेक्षक बहुधा प्रथमच हा शब्द उच्चारत असतात. हा इतिहास आमच्या नाटकाने घडविला. हा इतिकास पुस्तकाच्या रूपात जतन करण्याचा प्रयत्न आहे.

पुरुष सेक्शुअँलिटीवर नाटक
आमच्या ग्रुपशी जोडलेले कार्यकर्ते पुरुष सेक्शुअँलिटीवर नाटक करू या, असा आग्रह धरीत आहेत. हे नाटक पुरुषाने लिहावे असे मला वाटते. या विषयावर आमचे वर्कशॉप सुरू आहे; तसे नाटक करण्याचा प्रयत्न आहे, असे वंदना खरे यांनी सांगितले.


नाटकातील एक कलाकार समीक्षा हिच्या नवऱ्याने लिहिलेला लेख दिव्यमराठी च्या विशेषांकात आहे.

No comments:

Post a Comment