मागच्या वर्षी ‘नवा माणूस’ दिवाळी अंकात लेख लिहिण्याच्या निमित्ताने माझी या नाटकाशी जवळून ओळख झाली. संशोधनाच्या रूपात गोळा केलेली माहिती पुन्हा एका सृजनात्मक आविष्काराच्या रूपात समाजापर्यंत पोहचविणे आणि त्यातून समाजोपयोगी काम सुरू करणे, ही या नाटकाची प्रक्रिया मला खूप जवळची वाटली. एकप्रकारे मी आजवर ज्या प्रकारचे काम माझ्या संशोधन आणि प्रशिक्षणांच्या निमित्ताने केले आहे, त्याचा पुढचा भाग म्हणजे हे नाटक आहे, असे मला वाटते. मी या नाटकाकडे केवळ एक परफॉर्मन्स या दृष्टिकोनातून पाहतच नाही. या नाटकाचा प्रयोग हे एक साधन आहे. स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलायला एक ‘अवकाश’ (स्पेस) निर्माण करणारी संधी या नाटकाच्या निमित्ताने तयार व्हावी, हा माझा हे नाटक करण्याचा मूळ उद्देश आहे. या प्रयोगांच्या निमित्ताने स्त्रियांनी आपल्या लैंगिकतेकडे ‘शारीरिक आरोग्य’ या मुद्दय़ापलीकडे जाऊन पाहावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे..
1 comment:
One best subject you have taken up. Very Good for Society. Keep It Up
Post a Comment