सॉरी! मी आधीच्या पोस्टमध्ये दिलेली लिंक चुकीची आहे असे लक्षात आले! आता प्रशांत च्या लेखाची योग्य लिंक देते आहे! ह्यामुळॆ तुम्हाला तो लेख जसाच्या तसा वाचता येईल.
http://www.scribd.com/doc/18543822/Gujgoshti-Article?secret_password=6jwlmzggz85cf88to1j
This is a blog about my play "Yoneechyaa Maneechyaa Gujgoshti" . It is a first ever marathi translation of the internationally acclaimed play - "The Vagina Monologues"
Monday, August 17, 2009
Thursday, August 13, 2009
फुली फुली ने सांगितलेल्या हितगोष्टी
प्रशांत खुंटे ने पुण्यातला प्रयोग पाहून लिहिलेला लेख इथे वाचायला ठेवण्याचा प्रयत्न गेले दोन दिवस मी वेगवेगळ्या प्रकारे करते आहे.त्या शोधाशोधीत मला "स्क्रिब्ड" हा नवाच प्रकार सापडला.प्रशांतने दिलेली फाईल मी आता तशीच्या तशी तुम्हाला वाचाण्यासाठी देऊ शकते. तुम्ही फक्त खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
[scribd id=18543822 key=key-bsj2bkhphtxrtga704p]
[scribd id=18543822 key=key-bsj2bkhphtxrtga704p]
Tuesday, August 11, 2009
पुरुषांचा प्रतिसाद
नाटकाच्या नावावरुन हे नाटक स्त्रीयांच्या लैंगिकतेविषयी असल्याचं लक्षात येतंच! प्रेक्षकांमध्ये ही स्त्रीयाच जास्त असतात. काही ठिकाणी तर फक्त स्त्रीयांसाठीच प्रयोग आयोजित करण्यात आले होते. मला मात्र वाटतं की हे नाटक पुरुषांनीही पहावं!
मला पुरुष प्रेक्षकांकडून नेहमीच चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत चर्चेच्या वेळीही अनेकदा पुरुष मोकळेपणाने मत व्यक्त करतात, पाठिंबा देतात. एकदा एका पुरुष प्रेक्षकाने हया नाटकाचा एखादा प्रयोग फक्त पुरुषांसाठी ठेवावा असे सुचवले - त्याचं असं म्हणणं होतं की, हे नाटक पाहिल्यानंतर पुरुष बायकांच्या शरीरबद्दल जे वेडंवाकडं बोलतात त्याला आळा बसेल.जेंडर ह्या विषयावर प्रशिक्षण देणाऱ्या माझ्या एका मित्राने सांगितले की त्याला या नाटकाने अगदी आतून हलवून टाकले आहे. आपण स्वत:च्या लैंगिकतेचा देखिल किती वरवरचा विचार करीत होतो,याची नाटक पहाताना जाणीव झाली असे तो म्हणाला.आणखी एका मित्राला वाटते की, अशा प्रकारचा रिसर्च पुरुषांसोबत देखिल व्हावा आणि पुरुषांनाही अश्लीलतेच्या पलिकडे जाऊन सकारात्मक पद्धतीने स्वत:ची लैंगिकता व्यक्त करायची संधीमि ळावी. पुरुषांना हे नाटक पाहिल्यामुळे स्वत:च्या लैंगिकतेकडे डोळस पणे पाहण्याची प्रेरणा मिळेल असे त्याचे मत आहे.
सुनील शानभाग एक प्रयोगशील रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध आहेत।ते प्रयोगानंतर म्हणाले की, इंग्रजी नाटक पाहून मी फक्त असा विचार केला की अमेरिकेतले लोक असा विचार करतात तर! पण मराठी रुपांतर पाहून लक्षात आले की माझ्या पलिकडच्या घरात रहाणाऱ्या काकू काय विचार करीत असतील. मी स्वत:ला फार सुशिक्षित आणि पुढारलेला समजत असे; पण हे नाटक पहाताना मला आश्चर्याचे धक्के बसत गेले आणि मला त्याचे छान वाटले।
पुण्याच्या प्रयोगानंतर प्रशांत खुंटे नावाच्या मुलाच्या मनात जे तरंग उठले ते त्याने माझ्याकडे पाठवले आहेत। ते इथे त्याच्याच शब्दात मांडत आहे. त्याच्या लेखाचे नाव आहे,

"फुली-फुलीने सांगितलेल्या हितगोष्टी"
ह्या लेखाची pdf मला इथे लावयची होती.पण मला तसे करता येत नाही आहे! लेख १३०० शब्दांचा आहे, तो पुन्हा युनिकोड फॉन्टमध्ये लिहित खूप वेळ जाईल. म्हणून मी आता त्याची प्रिन्ट काढून त्याचा फोटो इथे लावेन। दोन दिवस थांबा! एक सुंदर लेख इथे वाचायला मिळणार आहे....Tuesday, August 4, 2009
प्रतिसाद
जुलै महिन्यात अभिवाचनाचे तीन प्रयोग पार पडले. प्रयोगादरम्यान हशा, टाळ्या आणि नंतरच्या गप्पा या बाबतीतला तीनही ठिकाणचा प्रतिसाद निरनिराळा होता. स्नेहसदन मध्ये केलेया अभिवाचनाला हशे अन टाळ्या तर वसूल झाल्या पण नंतर चर्चेला कुणी थांबले नाही.प्रयोग सुरू करायला उशीर झाला होता हे त्याचे मुख्य कारण असावे.पण तो प्रयोग करताना आम्हाला कलाकार म्हणून मजा आली होती.दुसऱ्या दिवशी पुण्यातच सुदर्शन मद प्रकाशयोजनेसहित प्रयोग करायला फारच छानवाटत होते. म्युझिकने जरा दगा दिला. पण एकूणात मजा आली. नंतर थोडी तरी चर्चा झाली. विद्या बाळ यांनी विचारले की तुम्हाला मिळालेली सर्वात वाईट प्रतिक्रिया काय होती. तेव्हा मला अगदी चटकन आठवलेली प्रतिक्रिया कोल्हापूरची होती. जेव्हा एकजण नाटकाला चीप, टुकार असे म्हणाले होते. पण नंतर जाणवले की त्या शिवाय एकप्रकारची प्रतिक्रिया जास्त नकोशी वाटली होती; ती म्हणजे ह्या विषयाबद्दल आस्था असलेले लोक नाटक पाहिल्यावर म्हणतात की या नाटकात जरा हसण्याखिदळण्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. अनेक जणांना बलात्कारा संबंधीचा गंभीर प्रवेश आवडतो. पण जे थोडेसे assertive भाग आहेत ते मात्र खटकतात.
साहजिकच आहे म्हणा;वर्षानुवर्षात आपल्याला स्त्रीयांच्या लैंगिकते बद्दल जास्तीजास्त फक्त अन्याय, अत्याचार अशा संदर्भातलाच विचार करायची सवय झालेली असते. त्यामुळे अश्लीलतेचा निषेध करणे किंवा वेदनांबद्दल रडणे या व्यतिरिक्त स्त्रीयांनी लैंगिकतेविषयीची अभिव्यक्ती सकारात्मक पद्धतीने करणे खटकणे साहजिकच आहे. गोरेगावच्या प्रयोगानंतर एका बाईंनी नाटकावर एक निराळाच आक्षेप घेतला! त्यांचे म्हणणे होते की - अजून लोकांचे भाकरीचे प्रश्न सुटलेले नाहित आणि तुम्ही लैंगिकतेसारख्या विषयावर बोलायची काय गरज आहे? अमेरिकेत समानता असलेल्या ठिकाणी हे बोलायची चंगळ करावी हवी असेल तर, देशात हे नाटक अप्रस्तुत (irrelevant)आहे - असे त्यांना वाटत होते. प्रेक्षकांत अनेकांना हा विचार पटलेला नव्हता असे दिसत होते. काहीजण विचारात पडले होते!पण यावर मी काय उत्तर देते याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. अनेक जण खाणाखुणा करून - चांगले उत्तर द्या - असे मला सुचवत होते. मला या अशा प्रतिक्रियेची थोडी गंमत वाटली! स्वत:ला ’कार्यकर्ते’ समजणारे लोक समाजाच्या प्राथमिकता काय असाव्यात हे स्वत:च का ठरवून टाकतात? त्यातही लैंगिकता कमी महत्त्वाची आणि भाकरी जास्त महत्त्वाची हे कसे ठरते?गरीब लोक सेक्स करीत नाही का? गरीब स्त्रीयांचे लैंगिकतेच्या कारणावरून शोषण होत नाही का? आणि आर्थिक प्रश्न, लैंगिकप्रश्न, धार्मिक प्रश्न, कायदेविषयक प्रश्न अशा वॉटरटाईट कप्प्यांमध्ये जगतो का आपण? भाकरीचा प्रश्न सुटल्यावर इतर सगळे प्रशन आपोआप सुटतात अशी भाबडी कल्पना किती काळ कुरवाळत बसणार आपण? मला तर जगणं म्हणजे अशा अनेक तुकड्यांनी बनलेल्या जिगसॉ पझल सारखं वाटतं . . . सर्व तुकडे एकमेकांशी जोडलेले आणि एखादा जरी हरवला तरी सगळं पझल अपूर्ण ठरणार - जगण्याची ही व्यामिश्रताच तर त्याला सुंदर बनवते आणि आव्हानात्मक देखिल!माझा हा मुद्दा बाकीच्या प्रेक्षकांना फारच पटला आणि त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद पण दिला.
-
अनेक महिन्यात ब्लॉग लिहिला नाही. . . काम मात्र भरपूर सुरू होते ; इतके की - जून नंतर नाटकाचे प्रयोग करायलाही वेळ मिळेनासा झाला. मागच्या महिन...
-
कणेकरांच्या आचरट लेखाला मी दिलेले उत्तर आवडल्याचे अनेक फोन्स आणि ई-मेल्स येताहेत. केवळ महाराष्ट्राच्याच कोनाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी अमेरीक...