मला पुरुष प्रेक्षकांकडून नेहमीच चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत चर्चेच्या वेळीही अनेकदा पुरुष मोकळेपणाने मत व्यक्त करतात, पाठिंबा देतात. एकदा एका पुरुष प्रेक्षकाने हया नाटकाचा एखादा प्रयोग फक्त पुरुषांसाठी ठेवावा असे सुचवले - त्याचं असं म्हणणं होतं की, हे नाटक पाहिल्यानंतर पुरुष बायकांच्या शरीरबद्दल जे वेडंवाकडं बोलतात त्याला आळा बसेल.जेंडर ह्या विषयावर प्रशिक्षण देणाऱ्या माझ्या एका मित्राने सांगितले की त्याला या नाटकाने अगदी आतून हलवून टाकले आहे. आपण स्वत:च्या लैंगिकतेचा देखिल किती वरवरचा विचार करीत होतो,याची नाटक पहाताना जाणीव झाली असे तो म्हणाला.आणखी एका मित्राला वाटते की, अशा प्रकारचा रिसर्च पुरुषांसोबत देखिल व्हावा आणि पुरुषांनाही अश्लीलतेच्या पलिकडे जाऊन सकारात्मक पद्धतीने स्वत:ची लैंगिकता व्यक्त करायची संधीमि ळावी. पुरुषांना हे नाटक पाहिल्यामुळे स्वत:च्या लैंगिकतेकडे डोळस पणे पाहण्याची प्रेरणा मिळेल असे त्याचे मत आहे.
सुनील शानभाग एक प्रयोगशील रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध आहेत।ते प्रयोगानंतर म्हणाले की, इंग्रजी नाटक पाहून मी फक्त असा विचार केला की अमेरिकेतले लोक असा विचार करतात तर! पण मराठी रुपांतर पाहून लक्षात आले की माझ्या पलिकडच्या घरात रहाणाऱ्या काकू काय विचार करीत असतील. मी स्वत:ला फार सुशिक्षित आणि पुढारलेला समजत असे; पण हे नाटक पहाताना मला आश्चर्याचे धक्के बसत गेले आणि मला त्याचे छान वाटले।
पुण्याच्या प्रयोगानंतर प्रशांत खुंटे नावाच्या मुलाच्या मनात जे तरंग उठले ते त्याने माझ्याकडे पाठवले आहेत। ते इथे त्याच्याच शब्दात मांडत आहे. त्याच्या लेखाचे नाव आहे,
"फुली-फुलीने सांगितलेल्या हितगोष्टी"
ह्या लेखाची pdf मला इथे लावयची होती.पण मला तसे करता येत नाही आहे! लेख १३०० शब्दांचा आहे, तो पुन्हा युनिकोड फॉन्टमध्ये लिहित खूप वेळ जाईल. म्हणून मी आता त्याची प्रिन्ट काढून त्याचा फोटो इथे लावेन। दोन दिवस थांबा! एक सुंदर लेख इथे वाचायला मिळणार आहे....
No comments:
Post a Comment