Tuesday, August 4, 2009

प्रतिसाद



जुलै महिन्यात अभिवाचनाचे तीन प्रयोग पार पडले. प्रयोगादरम्यान हशा, टाळ्या आणि नंतरच्या गप्पा या बाबतीतला तीनही ठिकाणचा प्रतिसाद निरनिराळा होता. स्नेहसदन मध्ये केलेया अभिवाचनाला हशे अन टाळ्या तर वसूल झाल्या पण नंतर चर्चेला कुणी थांबले नाही.प्रयोग सुरू करायला उशीर झाला होता हे त्याचे मुख्य कारण असावे.पण तो प्रयोग करताना आम्हाला कलाकार म्हणून मजा आली होती.दुसऱ्या दिवशी पुण्यातच सुदर्शन मद प्रकाशयोजनेसहित प्रयोग करायला फारच छानवाटत होते. म्युझिकने जरा दगा दिला. पण एकूणात मजा आली. नंतर थोडी तरी चर्चा झाली. विद्या बाळ यांनी विचारले की तुम्हाला मिळालेली सर्वात वाईट प्रतिक्रिया काय होती. तेव्हा मला अगदी चटकन आठवलेली प्रतिक्रिया कोल्हापूरची होती. जेव्हा एकजण नाटकाला चीप, टुकार असे म्हणाले होते. पण नंतर जाणवले की त्या शिवाय एकप्रकारची प्रतिक्रिया जास्त नकोशी वाटली होती; ती म्हणजे ह्या विषयाबद्दल आस्था असलेले लोक नाटक पाहिल्यावर म्हणतात की या नाटकात जरा हसण्याखिदळण्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. अनेक जणांना बलात्कारा संबंधीचा गंभीर प्रवेश आवडतो. पण जे थोडेसे assertive भाग आहेत ते मात्र खटकतात.


साहजिकच आहे म्हणा;वर्षानुवर्षात आपल्याला स्त्रीयांच्या लैंगिकते बद्दल जास्तीजास्त फक्त अन्याय, अत्याचार अशा संदर्भातलाच विचार करायची सवय झालेली असते. त्यामुळे अश्लीलतेचा निषेध करणे किंवा वेदनांबद्दल रडणे या व्यतिरिक्त स्त्रीयांनी लैंगिकतेविषयीची अभिव्यक्ती सकारात्मक पद्धतीने करणे खटकणे साहजिकच आहे. ोरेगावच्या प्रयोगानंतर एका बाईंनी नाटकावर एक निराळाच आक्षेप घेतला! त्यांचे म्हणणे होते की - अजून लोकांचे भाकरीचे प्रश्न सुटलेले नाहित आणि तुम्ही लैंगिकतेसारख्या विषयावर बोलायची काय गरज आहे? अमेरिकेत समानता असलेल्या ठिकाणी हे बोलायची चंगळ करावी हवी असेल तर, देशात हे नाटक अप्रस्तुत (irrelevant)आहे - असे त्यांना वाटत होते. प्रेक्षकांत अनेकांना हा विचार पटलेला नव्हता असे दिसत होते. काहीजण विचारात पडले होते!पण यावर मी काय उत्तर देते याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. अनेक जण खाणाखुणा करून - चांगले उत्तर द्या - असे मला सुचवत होते. मला या अशा प्रतिक्रियेची थोडी गंमत वाटली! स्वत:लाकार्यकर्तेसमजणारे लोक समाजाच्या प्राथमिकता काय असाव्यात हे स्वत: का ठरवून टाकतात? त्यातही लैंगिकता कमी महत्त्वाची आणि भाकरी जास्त महत्त्वाची हे कसे ठरते?गरीब लोक सेक्स करीत नाही का? गरीब स्त्रीयांचे लैंगिकतेच्या कारणावरून शोषण होत नाही का? आणि आर्थिक प्रश्न, लैंगिकप्रश्न, धार्मिक प्रश्न, कायदेविषयक प्रश्न अशा वॉटरटाईट कप्प्यांमध्ये जगतो का आपण? भाकरीचा प्रश्न सुटल्यावर इतर सगळे प्रशन आपोआप सुटतात अशी भाबडी कल्पना किती काळ कुरवाळत बसणार आपण? मला तर जगणं म्हणजे अशा अनेक तुकड्यांनी बनलेल्या जिगसॉ पझल सारखं वाटतं . . . र्व तुकडे एकमेकांशी जोडलेले आणि एखादा जरी हरवला तरी सगळं पझल अपूर्ण ठरणार - जगण्याची ही व्यामिश्रताच तर त्याला सुंदर बनवते आणि आव्हानात्मक देखिल!माझा हा मुद्दा बाकीच्या प्रेक्षकांना फारच पटला आणि त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद पण दिला.











No comments:

Post a Comment