Wednesday, September 16, 2009

पुन्हा एकदा बातमीत

http://www.mumbaimirror.com/index.aspx?Page=article&sectname=News%20-%20City&sectid=2&contentid=2009091520090915024522671652aec79

काल मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रात "योनीच्या मनीच्या गुजगोष्ती" बद्दल बातमी आली आहे. तिची लिंक वर दिलेली आहेच!
दुर्दैवाने या बातमीतल्या तपशीलात बऱ्याच चुका आहेत.
पण एकदा छापून आल्यावर काही इलाज नसतो!असो.

या नाटकाशी संबंधीत एक नवीन प्रकल्प सुरू करीत आहे.
" Braking Silence, Voicing Concerns"
या प्रकल्पाद्वारे मी कार्यशाळांची मालिका सुरू करीत आहे. या कार्यशाळांमध्ये स्त्रीया, पुरुष आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती सहभागी होणार आहेत. लैंगिकतेविषयीच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी एक अवकाश तयार करता यावे असा या मागचा उद्देश आहे. यात सहभागी होणाऱ्या व्यक्ती कथा, कविता, स्वगते अशा विविध रूपात अभिव्यक्ती करतील. वेळोवेळी त्याबद्दलची माहिती इथे मी सांगत जाईनच!

No comments:

Post a Comment