Tuesday, February 26, 2013

मागच्या आठवड्यात नाटकाचे जे दोन प्रयोग झाले -त्यानंतर प्रेक्षकातील काही महिलांनी फेसबुक वरती आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या नाटकाचे प्रेक्षक कुठल्या विचारापासून कुठपर्यंत प्रवास करतात - त्याची नोंद त्यांच्याच शब्दात . . .
प्रिया प्रभुदेसाई  - "

"शाळेत असताना रामरक्षा पठण स्पर्धा होती .पहिले १५ श्लोक असतील पाठांतराला..... .

शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज:

याचा अर्थ आहे राघव माझ्या मस्तकाचे आणि दशरथ पुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करोमस्तकापासून ते चरणापर्यंत माझ्या सर्व शरीराचे तू रक्षण कर असा ढोबळ अर्थ आहे या श्लोकांचा . मी / वर्षाची असेन. हातवारे करून मी ते श्लोक म्हणत असेन ... मस्तक आले तर डोक्यावर हात ठेवायचा , डोळे असेल तर डोळ्यावरपण सक्थिनी हा शब्द आला तेव्हा hips वर कसा हात ठेवणार ? मी नाही ठेवला .

आज या प्रसंगाची इतक्या वर्षाने आठवण झाली कारण " योनीच्या मनीच्या गुजगोष्टी " हे नाटक बघून आले . Vagina Monologues या Eve Ensler ने लिहिलेल्या प्रसिद्ध नाटकाचे हे मराठी रूपांतर . मुळात Vagina Monologues हे नाटक पाहायला जायची इच्छा होती पण काही शब्द आपण अजिबात उच्चारत नाही अगदी घरीही नाही. "अहो , संगीत शाकुंतल लागले आहे ,जायचे का पाहायला ??" या चालीवर " Vagina Monologues" लागले आहे ,जायचे का ? " कानाला सुद्धा बरे नाही वाटत !!!!
म्हणून ते राहूनच गेले. त्यामुळे जेव्ह Pratibha ne सांगितले कि आपण जावूया का? मी लगेच होकार दिलाकुठले नाटक ? "प्रेमाच्या गावा जावे " घरात तसे काही सोवळे वातावरण नाही पण माझी मानसिकताच वर्षाच्या मुलीची होती हे खरे .

योनीच्या मनीच्या गोष्टी हे नाटक पाहायला जाते हे मी घरी नाही सांगितले ख़रे तर घरात बंधन नाही पण नाही सांगितले . मला का खरे सांगावसे वाटले नाही याचे उत्तर मला नाटक सुरु झाल्यावर मिळाले आपण नाक ,डोळे ,कान अगदी सहज म्हणतो पण जे अवयव स्त्री ला define करतात त्यांचा विचार तरी करतो ? नाटक पुरते बोलत नाही मी . काही कर्करोग सहज टाळता येतात जर बाईने स्वताची परीक्षा केली तर !!! पण सुशिक्षित समाजातही हे होत नाही हे खरे . योनी हा शब्द स्वताला liberal समजणाऱ्या मला हि थोडासा खटकला . प्रतिभा होती म्हणून खरे तर मी गेलेनाटकाला  गर्दि. अर्ध्या पेक्षा जास्त पुरुष , सर्व वर्गाचे, वयाचे . आमची ओळ शेवटची . मला थोडे दडपण आले .
योनी या शब्दाने सुरु झालेले हे नाटक हळूहळू तुम्हाला गुंतवत जाते . एक मुलगी, बहिण , आई , सून ,काकी , आजी या नात्यापलीकडे जावून तुम्ही तुमच्या बाई पणाचा आनंद घेवू लागतात . नव्याने . अगदी वयात येणाऱ्या मुलीपासून ते उतार वयातील बायकांचे अनुभव तुम्हाला तुमच्या प्रवासाची आठवण करून देतात. नाटकाची भाषा कधी उच्चारलेली तरीही खटकत नव्हति. मनाच्या गाठी अलगद सोडवणारी असे झाले माझे. ज्या गोष्टीचा उच्चार सुद्धा आपण करत नाही त्याचा विचार करायला भाग पाडते हे नाटक आणि तेही मार्मिक पद्धतीने . orgasm चा विषय इतका सुंदर हाताळला आहेते काम करणाऱ्या मुलीला माझा सलाम . सुरुवातीला शिट्या मारणारा crowd सुद्धा गप्पा झाला . खरेतर अंतर्मुख . कधी हे नाटक हसवते , कधी रडवते ,कधी कोपरखळी मारते तर कधी कानशीलातही लगावून देते .शेवटचा climax तर अफलातून आहे .
प्रत्येक जोडप्याने पाहावे असे हे नाटक अहे. sex education पेक्षा परीणामकारक .शेवटचा climax तर लाजबाब .  …. audience मध्ये खूप पुरुष  होतेसुरवातीला शिट्या ,हशा , चुकीच्या जागी पडत असतील पण नंतर प्रेक्षक अंतर्मुख होतात . शेवटी त्यानाही नाती असतातच की . एक मजा आहे , स्त्री स्वताचा सर्व नात्याने विचार करते पण बाई म्हणून नाही आणि पुरुष अपवाद सोडले तर फक्त मादी म्हणून पाहतात. इथे उलट होते . खरे तर हे नाटक जोडप्याने पाहावे . मैत्रिणी बरोबर , पत्नी बरोबर, आवडीच्या कोणाही बरोबर . तुमची आई , पत्नी , मुलगी, सखी तुम्हाला वेगळ्याने समजेल.
हे नाटक सादर करणे म्हणजे जोखीम आहे . कुठेही अश्लील किंवा अर्वाच्य करता एका बोल्ड विषयाचे अवधान सांभाळणे कठीण . आणि ते आव्हान मस्त पेलले आहे .
 
नाटक संपल्यावर Vandana Khare ला भेटायला गेलो . एक ७५ वर्षाच्या छान , सोज्जवळ आजी सुद्धा होत्या .त्यांचीही शाबासकी मिळाली .

घरी गेल्यावर नाटकाचे नाव सांगून dialogue सकट एकपात्री प्रयोग केला . पिढ्याच्या पुरुषांच्या चेहेर्यावर स्मित हास्य का होईना , उमटलेमाझ्या साठी प्रयोग यशस्वी ठरला" 


मृण्मयी रानडे-

At yashwant natya mandir, yonichya manuchya gujagoshti... It was fantastic. Cathartic, in a way. Wish i had seen it earlier. Thank you Vandana Khare for a great experience, which i shared with my mother in law!

मीना त्रिवेदी -

नाटक अगदी सोज्वळ होते... बाईला स्वत:बद्दल,योनी बद्दल, चूत बद्दल ची हिणकस वाटणारी भावना लोपून सेल्फ रिअलायझेशनकडे नेणारे... प्रेक्षकांचा सहभाग घेणे हे ही मला आवडले. to help shed inhibition about the theme, about mixed gender in the auditorium and in general personal negation..वंदना हे नाटक गुजरातीत कर ना!




अलका गांधी- असेरकर 


वंदना खरेचं.....योनीच्या मनीच्या गुजगोष्टी .........पाहिलं आज........मीना त्रिवेदी, मनिषा सिलम, आणखी दोघी तिघी मैत्रिणी.........एक वेगळा, छान अनुभव............. वंदना..........कालचं नाटक आवडलं.........छान आहे.......खूप संयतपणे हाताळलेलं आणि कुठेही अश्लील होऊ दिलेलं सुंदर नाटक आहे...
तुझा कोकणी भाषेतला पार्ट तू खूपच मस्त निभवतेस........मजा आली
ईव्हच्या मुळ नाटकाचं तू जसंच्या तसा अनुवाद केलायस का ...की काही बदल केलेयस......मला हे विचारावंस वाटलं कारण महिलांच्या हुंकारावरचा जो पार्ट आहे त्यात एक बाईच बाईला सुख देण्याविषयी बोलताना दाखवलीय......ते मुळ तसेच आहे का........की मुळ नाटकात तो पुरुष दाखवलाय........?
तुझ्या नाटकात काम करणा-या मुलींचंही कौतूक वाटलं...या कामासाठी तुला मुली मिळाल्या आपल्या समाजात हेच कौतूकाचं मुळात....त्यांच्या घरच्यांनी आक्षेप घेतला नाही...हे त्याहून कौतूकाचं..
त्यातील दोन मुली नेमक्या मी बसलेल्या डोंबिवली लोकलमध्येच चढल्या मला विचारून...पण माझ्या काही लक्षात नाही आलं.......डोंबिवली येता येता माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं...(त्या मागे बसल्या होत्या..).......मी त्यांचं अभिनंदन केलं.........लक्षात आल्यावर

 


 

1 comment:

Unknown said...

Hi Madam,
Attended today's show with some of my male friends at Sahitya Sangh. Drama was awesome. Except some foolish incidents in audience for which u were compelled to omit some dialogues Anyway.
Sharp direction and appropriate translation. You made me laugh throughout but and the end of it u made me much serious and made me to know agony of Vagina as well.
No doubt Abhilasha,Sudha and another (I cud nt hear her name in clapping) were fabulous. Specially convey best wishes to Abhilasha she was too good. And you were also too good in all of the acts.
Wish to see this play again.

Post a Comment